यावल दि .7 ता.प्र- आज दुपारी आठवडे बाजाराच्या दिवशी आठ हजार रुपयांचे सागवानी लाकुड़ वनक्षेत्रपाल एस आर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमा केल्याने अवैध सागवान लाकडाचा व्यवसाय करणाऱ्या मध्ये एकच खळबळ उडाली
वनक्षेत्रपाल एस आर पाटील यांनी माहिती दिली की त्यांना गुप्त खबर मिळाल्या नुसार हरीपुरा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याला गस्त करीत असताना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पुलाजवळ लपवून ठेवलेले सागवानी लाकडाचे चार नग अंदाजे किंमत आठ हजार रुपयेचा माल जप्त करून तो माल फारेस्ट डेपोट जमा केला कारवाई करतांना वनक्षेत्रपाल एस आर पाटील, वनरक्षक गस्ती पथक रवींद्र पवार संदीप पंडित पोलीस सचिन तडवी वाहनचालक भरत बाविस्कर होते या कारवाईमुळे आठवडे बाजाराच्या दिवशी लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post