यावल महसूल हद्दीत वाळू तस्करांवर प्रांताधिकार्‍यांची धडक कारवाई

0

वाळूने भरलेला ट्रक पकडला ; पोलीस,तलाठी ठरले निष्क्रिय

यावल :-  यावलकडून फैजपुरकडे जाणारा वाळूने भरलेला ट्रक प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी पकडून पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलीस स्टेशनला जमा केला. या कारवाईचे वृत्त कळताच वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाळू भरलेला ट्रक यावल पोलीस स्टेशन व् यावल महसूल हद्दीतुन जाताना पोलिसांना आणि  यावल सर्कल व संबंधित तलाठी यांना का दिसला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रांताधिकारी डॉक्टर थोरबोले यांनी जयपूर येथून यावल तहसील कार्यालयात येताना रस्त्यात त्यांना सांगवी बुद्रुक गावाजवळ वाळू भरलेला ट्रक (क्र. एम. एच. 18 -ई -7401) वाहतूक करीत असताना आढळून आला. वाळूने भरलेला ट्रक थांबविला असता ट्रक चालकाकडे वाळू वाहतूक परमिट पावती मागितली असता त्या पावतीमध्ये खाडाखोड केलेली असल्याचे दिसून आले त्यामुळे प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी सदरचा ट्रक पुढील कार्यवाहीसाठी यावल पोस्टला जमा केला यामुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली असली तरी हप्ते देणारे म्हणतात महिन्यातून एकदा वाहन पकडले गेले तरी आमच्यावर काहीएक परिणाम होत नाही अवैध गौण खनिज वाहतूक हप्तेबाजी मुळे कोणीही बंद करू शकत नाही असे सुद्धा वाळूतस्करांमध्ये खुलेआम बोलले जात आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक करणारे तसेच गौण खनिजाचा परवाना काढून गौण खनिज वाहतूक करणारे वाहन चालक वाळू, माती, गिरावल, दगड गोटे, मुरुम, खडी यावर वाहनात ताडपत्री न टाकता सुसाट वेगाने वाहने चालवित असतात त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या इतर वाहनचालकांना मोठा त्रास व अडथळा सहन करावा लागत असून इतर वाहनचालकांच्या डोळ्यात माती वाळू जात असल्याने विपरीत परिणाम होत आहेत याकरिता महसूल व पोलिस विभागाने कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.