यावल पोलिस ठाण्यात स्वच्छता अभियान ; संपूर्ण पोलिस ठाणे आवार झाले चकाचक

0

यावल : येथील पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पोलिस कर्मचारी, होमगार्ड तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाने संपुर्ण पोलिस ठाणे व परिसर क्लिन करण्यात आला कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपक्रम राबवला.

येथील पोलिस ठाण्यात स्वतः पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, उपनिरीक्षक अजमल खान पठाण, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले सह पोलीस कर्मचारी सुशील घुगे, विजय परदेशी, महिला पोलिस कर्मचारी ज्येती खराटे, सिमा चिखलकर सह आदींनी होमगार्ड आणी नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांना सोबत घेत स्वच्छता अभियान राबवले आणी रविवारी सुटीच्या दिवशी पालिकेचा अग्नी शमन बंब बोलावून पोलिस ठाण्यातील सर्व कक्ष धुवून टाकण्यात आले व संपूर्ण परिसर देखील स्वच्छ करण्यात आला सुटीचा दिवस असल्याने येथे नागरीकांची वर्दळ नव्हती म्हणुन पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनी श्रमदान करीत पोलिस ठाणे व परिसर स्वछ केले.

Leave A Reply

Your email address will not be published.