यावल नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षापदी सौ. पोर्णीमा फालक यांची बिनविरोध निवड

0

यावल (प्रतिनिधी) येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पौर्णीमा राजेंद्र फालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नगर परिषदच्या मावळत्या उपनगराध्यक्षा रुखमाबाई भालेराव (महाजन) यांनी ठरलेल्या अंतर्गत ठरावानुसार आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या रीक्त झालेल्या जागेवर सौ. पौर्णीमा राजेन्द्र फालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावल नगर परिषदेत आजची ही निवडीची सभा ऑनलाईन घेण्यात आली असून या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार होते तर नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, मुख्याधिकारी बबन तडवी नगरपालीकेत व्यासपिठावर उपस्थीत होते. सभेत माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील, राकेश मुरलीधर कोलते, प्रा. मुकेश पोपटराव येवले, नगरसेवक अभिमन्यु विश्वनाथ चौधरी यांचे सह नगरसेविकांनी यात आपला सहभाग घेतला. नुतन उपनगराध्यक्ष सौ . पौर्णीमा फालक यांचे सर्व सन्मानिय नगरसेवकांनी स्वागत करुन अभीनंद केले .

Leave A Reply

Your email address will not be published.