यावल तालुक्यात केबल व शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ ; पोलिसांचा धाक संपला

0

यावल :- तालुक्यात केबल चोरी व शेती उपयोगी साहित्य चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.सांगवी खुर्द येथील अनेक शेतक-यांचा टयुबवेलच्या इलेक्ट्रीक केबल्स अज्ञात चोरटयांनी तोडून चोरून नेल्या आहेत. आधिच तालुक्यात उन्हाचा तीव्र पारा आणि त्यात पिके वाचवण्यासाठी शेतक-यांची सुरू असलेली धडपड यात एैन वेळेवर चोरटयांच्या या  संतापजनक कृत्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीस आला आहे. केबल व शेती साहित्य चोरट्यांवर तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर यावल पोलिसांचा वचक राहिला नाही  असे तालुक्यातील शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

यावल-भी शिवारातील तालुक्यातील सांगवी खुर्द येथील  सदाशिव डीगंबर कोळी, विक्रम अमृत पवार, रमेश पंढरीनाथ पाटील, आनंदा रामदास धनगर, अूण माणिक धनगर, इच्छाराम पाटील, राजेंद्र साबळे, विजय आत्माराम पाटील, विजय साबळे, हिरामन पाटील, शरद सोनार , संजय अमृत सुर्यवंशी व अट्रावल येथील  बाळू खाचणे अट्रावल , हेमराज खाचणे  यांच्या शेतातील टयुबवेलच्या शनिवारी रात्री अज्ञात चोरटयांनी इलेक्ट्रीक पंपाच्या केबल्स तोडून चोरून नेल्या असल्याची माहिती मयुर प्रेमचंद कोळी यांनी दिली आहे.  सदाशिव डीगंबर कोळी, विक्रम अमृत पवार यांचे फिर्यादिवरून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

शेती साहीत्यांचीही चोरी

सद्या  चोरटयाकडून शेतातील पाईप्स, ठिबक नळया यांचीही चोरी हात असल्याने शेतकरी हैरान झाला आहे. मोकाट गुरे यांच्यापासूनही शेतक-याना मोठा त्रास आहे.

उन्हाचा पारा ४७ अंशावर

सद्या तालुक्यात उन्हाचा पारा ४७ अंशावर आहे त्यात शेतीला पुरेल एवढे पाणी नसल्याने शेतक-यांना टप्या-टप्यात   पाणी देवून पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे त्यातच एैनवेळेवर चोरटे आपली करामत दाखवत असल्याने शेतक-यामध्ये तीव्र सताप व्यक्त होत आहे. यावल पोलीस चोरट्यांचा व चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांच्या शोध तपास चौकशी करून कार्यवाही करतील किंवा नाही याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.