यावल तालुक्यात अवैद्यधंद्यांना सर्वत्र उधाण

0

 यावल (प्रतिनिधी) : तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन सर्व प्रकारच्या अवैद्यधंद्यांना उत आले असुन आदीच सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या महामारीत आर्थीक संकटात सापडलेले असतांना शहरात आणी ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर  अवैद्यधंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे .

दरम्यान यावल तालुक्यात सर्वत्र सट्टा मटक्याच्या पेठया सुरू असल्याने अनेक मजुरांनी आपल्या कामाकडे पाठ फिरवत आहे, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैद्यरित्या सार्वजनिक ठीकाणी बेकाद्याशीर देशी दारू , हातभट्टीची घातक गावटी दारूची विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलही या दारू व्यसनाच्या आहारी जातांना दिसत आहे . याच बरोबर जिल्ह्यात सर्वत्र बंद असलेली कालबाह्य झालेल्या मिनिडोअर वाहनातुन होणारी अवैद्य प्रवासी वाहतुक मुळे गरजु प्रवासांची आर्थिक लुट करुन अवा की सव्वा भाडे वसुल केले जात असुन , याशिवाय आसन क्षमते पेक्षा अधिक प्रवासी बसवुन अवैद्य प्रवासी वाहतुक करणारे मिनिडोअर चालकांकडुन कोरोना संसर्गनियमांची उघड उघड पायमल्ली केली जात आहे .

विविध ठीकाणी जुगारीचे अड्डे सुरू असल्याने भुरटया चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे . सार्वजनिक ठीकाणी खुलेआम गुटका विक्री होत असुन असा प्रकारच्या अवैद्यधंद्यांना सर्वत्र ऊधाण आले असून, मागील सहा सात महीन्यांच्या कालावधीत कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीत लॉक डाऊनच्या संकटकाळात सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असुन , त्या आर्थिक संकटातुन नागरिक  बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच यात तालुक्यात शहर परिसर व ग्रामीण क्षेत्रात अवैद्यधंद्यांनी धुमाकुळ माजवला असुन , या सहज मिळणाऱ्या दारू , सट्टा मटका या अवैद्य धंद्यायांच्या माध्यमातुन पैशांच्या प्रलोभनाला बळी पडुन अनेकांचे संसाराच्या राख रांगोळी होवुन त्यांचे संसार उद्धवस्थ होवुन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे प्रसंग ओढवु लागले आहे .पोलीस प्रशासनाने तात्काळ असा प्रकारच्या अवैद्यधंद्यांना वेळीच प्रतिबंध करणे नागरीकांच्या हिताचे असेल अशी प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.