फैजपूर प्रतिनिधी: यावल तालुक्यात जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथील कोविड सेंटरकरिता ड्युरा सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसवण्यासाठी रकमेची आवश्यकता होती. त्यासाठी फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कैलास कडलग सो,तहसिलदार महेश पवार,गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी तालुक्यातील सर्व जि.प. तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर यांना स्वेच्छेने देणगी स्वरूपात रक्कम द्यावी यासाठी आवाहन केले होते.
सदर आवाहनाला खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत केवळ तीनच दिवसात सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी एकूण चार लाख पाच हजार आठशे पंधरा रुपये (४०५८१५ रु.) जमा करुन फैजपूर कोविड सेंटरमध्ये ड्युरा सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसवणे कामी मदत केली.एवढी मोठी रक्कम मदत करण्याचे कार्य जिल्ह्यातून प्रथमच यावल तालुक्यातील शिक्षकांनी केलेले आहे.सदर रक्कम ही तहसिलदार महेश पवार यांचेकडे सुपूर्त करण्यात आली.सदर प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,गटशिक्षणाधिकारी नईम शेख,गटसमन्वयक प्रमोद कोळी,योगेश इंगळे ,इम्तियाज फारुकी आणि कुंदन वायकोळे हे उपस्थित होते.तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर यांनी मदतीसाठीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठा निधी जमा केला त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.आमदार शिरीष चौधरी यांनीही या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.