यावल : यावल तालुका पोलिस पाटील संघटनेची सभा दि.१ जानेवारी रोजी कृषी उत्पंन्न बाजार समीतीच्या सभागृहात पोलिस पाटील संघटनेचे खांन्देश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात यावल तालुका पोलिस पाटील संघटनेची कार्येकारीणी जाहीर करण्यात आली.
संघनेच्या तालुका अध्यक्ष पदी गिरडगाव येथील पोलिस पाटील अशोक रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी मकबुल मेहबुब तडीवी यांची नियुक्ती करण्यात आली. सुरेश खैरनार सचिव चंन्द्रकांत पाटील सहसचिव किरण पाटील कार्येअध्यक्ष गणेश पाटील कार्येकारी अध्यक्ष गणेश वानखेडे तसेच संघटक अध्यक्षपदी सौ.प्रफुल्लाताई पाटील व सौ.माधुरीताई राजपूत यांची निवड करण्यात आली यावेळी गोकुळ पाटील,महेमुद तडवी,कैलास पाटील,उपजिल्हाअध्यक्ष पंकज बडगुजर माजी तालुका अध्यक्ष पवन पाटील,चंदु इंगडे,कैलास सोळंके,मनोज पाटील,दिपक पाटील इ.सह तालुक्यातील पो.पा.उपस्थीत होते संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील व सर्व सदस्यांचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिस उप निरीक्षक जितेंन्द्र खैरनार यांनी अभिनंदन केले.