यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 1 कोटी 20 लाखांचा अपहर

0

6 अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

यावल दि. 18
जिल्हास्तरीय असलेल्या यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सन 2005 ते 2010 पर्यंतच्या कालावधीत तत्कालीन एकूण सहा प्रकल्प अधिकार्याांनी संबंधितांशी संगनमतकरून वेगवेगळ्याा आदिवासी बांधवांच्या योजनेत 1 कोटी 20 लाख 4 हजार 845 रूपयांच्या निधीचा अपहार करून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला फसवणुक व अपहाराचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण आदिवासी विभागात एकच खळबळ उडाली .
यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यावल ए.आ. वि. प्रकल्प कार्यालयात सन 2005 ते 2010 या पाच वर्षाच्या कालावधीत आदिवासी नवविवाहितांना भांड्यांचा संच व मंगळसूत्र योजना, व कन्यादान योजना, दुधाळ जनावरांचे वाटप करणे, एचडीपीई पाईप पुरवठा करणे इत्यादी योजनेत तत्कालीन सहा प्रकल्प अधिकारी ताराचंद पाडवी, एन.एम. निकुंमे, जी.एन. वळवी, उमाळे, थोरात व पुरवठा करणारा सागर धामणे व काही कार्यालयाशी संबंधित कर्मचार्याांनी संगनमतकरून शासकीय निधी वाटपाचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असतांना रेकॉर्ड न ठेवता सदरच्या विविध योजनेमध्ये 1 कोटी 20 लाख 4 हजार 845 रूपयांचा निधी वाटप करून खोटे अभिलेख/ दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक व अपहार केल्याची तक्रार गेल्या दोन महिन्यात बदली झालेले प्रकल्प अधिकरी आर.बी. हिवाळे यांनी यावल पोलिस स्टेशनला दिल्यावरून भाग 5 गुरनं 30/2018 भादंवि 420, 409, 465, 468, 34 प्रमाणे सहा प्रकल्प अधिकार्याांसह पुरवठा करणार्याा व्यक्ती, ठेकेदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशी पो.नि. परदेशी दत्तात्रय यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सुनिता कोळपकर, पो.हे.कॉ. संजय तायडे, पो. कॉ. विकास सोनवणे करीत आहे.
संशयीत आरोपीताची तथा अधिकार्याांच्या कार्यालयीन कामकाजाची चौकशी अहवाल सेवानिवृत्त न्यायाधिश एम.जी. गायकवाड यांच्या 5 सदस्यीय समितीने सादर केलेला आहे. या प्रकल्प अधिकार्याांची विभागीय चौकशी सुद्ध सुरु असल्याने या अधिकार्याांना अटक होणार का? याकडे संपूर्ण आदिवासी विभागाचे नाशिक विभागात, रायात लक्ष वेधून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.