यावल:- दरवर्षी प्रमाणे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे दि१३ रोजी सायंकाळी शहरात आगमन झाले. येथील धनश्री चित्र मंदिराचे आवारात माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे व नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांनी सपत्नीक पालखी पुजन केल्यांनतर बोरावल गेट, म्हसोबा मंदिर, गवत बाजार, कोर्ट रोड, नगरपालीका मार्गे पालखीची भव्य मीरवूणक काढत शिवाजीनगरात प्रा. मुकेश येवले यांच्या निवासस्थानी पोहचली.
रात्री श्री स्वामी समर्थांची महापूजा करण्यात येवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसंगी नगरसेवक सुधाकर धनगर, प्रविण घोडके, सुखदेवराव बोदडे, देवकांत पाटील,हेमंत येवले, अमोल दुसाने, बापु जासुद, अरूण लोखंडे यांचेसह जेष्ट नागरीक संघाचे सर्व जेष्ठ नागरीक सभासद, व भाविक स्री-पुरुष तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने मीरवूणकीत सहभागी झाले होते.पालखीचे सावद्याकडे प्रस्थान झाले.