घटनेने व्यापारी वर्गात घबराट : पोलिसांचा धाक संपला
यावल :- येथील मेन रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक दि. 13 रोजी रात्री आपले ज्वेलर्सचे दुकान बंद करून दुकानातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण अंदाजे सहा लाख रुपयाचा ऐवज घरी घेऊन जात असताना त्यांची मोटरसायकल भर रस्त्यात अडवून तीन चोरट्यांनी अचानक त्यांच्यावर चाकूहल्ला करून सहा लाखाच्या ऐवजाची बॅग लंपास केली. समर्थ ज्वेलर्सचे मालक श्रीनिवास नंदकिशोर महालकर यांच्यावर चाकूचा वार होतास त्यांनी आरडाओरड केल्याने तरुणांच्या जमावाने एका आरोपीस पकडून चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिला. तर इतर दोन आरोपी मुद्देमालासह फरार झाले आहे. ही सिनेमास्टाईल थरारक घटना शुक्रवार रोजी बाजाराच्या दिवशी रात्री घडल्याने संपूर्ण व्यापारीवर्गात घबराट निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षभरात यावल पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना आव्हानात्मक गुन्हे व घटना घडलेल्या आहेत, अवैध धंदेवाले व गुन्हेगार अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून गुन्हें व अप्रिय घटना घडवीत असल्याने गुन्हेगार आक्रमक झाले आहेत तर पोलिसांचा धाकच संपला असे जनतेच बोलले जात आहे.
मेन रोडवरील चावडी जवळ असलेले समर्थ ज्वेलर्सचे मालक नंदकिशोर महालकर हे आपले दुकान बंद करून बीएसएनएल कार्यालयाजवळील त्यांच्या घरी मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्या घराजवळ तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल / स्कुटी अडवून त्यांच्या खांद्यावर चाकूने वार केला यात महालकर यांनी अज्ञात चोरट्यांना जोरदार प्रतिकार करुन आरडा ओरड केली यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन एका चोरट्यास पकडून चांगला चोप दिला. गर्दीचा फायदा घेत दोन लुटारू सहा लाखाचा ऐवजाच्या बॅगसह फरार झाले. यावल पोलीस वेळीच घटनास्थळी हजर झाल्याने आरोपीस जीवदान मिळाले, पोलिस वेळेवर हजर झाले नसते तर आरोपीच्या जिवास मोठा धोका निर्माण झाला असता, पकडला गेलेला संशयित आरोपी आकाश सुरेश सपकाळे हा जळगाव येथील जैनाबाद मधील रहिवासी असल्याचे समजले या तीन संशयित आरोपींना यावल येथील एका गोलू नावाच्या मुलाने सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची दैनंदिन येण्या- जाण्या ची माहिती दिल्याचे बोलले जात असले तरी पोलिस तपासात चौकशीत काय निष्पन्न होते, लुटून नेला सहा लाखाचा ऐवज पोलिसांना हस्तगत करण्यात यश येते किंवा नाही याकडे संपूर्ण व्यापारी वर्गाचे लक्ष वेधून आहे.