यावलमध्ये पिस्तुलाच्या धाकाने कवडीवाले यांच्या दुकानावर दरोडा

0

यावल | प्रतिनिधी

शहरातील नगरपालिका रोडवरच्या कवडीवाले यांच्या सराफा दुकानात चौघा दरोडेखोरांनी जगदीश कवडीवाले यांच्या कानशीलाला पिस्टल लावत लाखो रुपयांच्या सोन्याची लूट करीत पळ काढला. आज बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांना अटकाव करताना त्यांचे दोन पिस्टूल रस्त्यावर पडले.

जगदीश कवडीवाले ( रा- यावल ) यांचे मुख्य बाजारपेठेत बाजीराव काशिनाथ कवडीवाले या नावाचे सराफ दुकान आहे आज नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता त्यांनी दुकान उघडून व्यवहार सुरू केले दरम्यान दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका पल्सर गाडीवर ३ अज्ञात दरोडेखोरांनी येऊन दागिने बनवायचे सांगितल्याचा बहाणा केला व त्यानंतर चौघा संशयीत आल्याने एकाने दुकानदार जगदीश कवडीवाले यांच्या कानशीलावर बंदुक लावत दुकानातील सोने काढून देण्यास भाग पाडले.

कानशिलावर बंदूक लावल्यानंतर शटर बंद करून दुकानातल्या सर्वच सोन्या-चांदीच्या वस्तू गोळा केल्या दरम्यान जगदीश कवडीवाले यांचे वडील हे जेवण करून दुकानात आलेत शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही कानशिलावर बंदूक लावली आणि

अवघे पाच ते दहा मिनिटात लूट करून चोरटे पसार झाले. घटनास्थळावरून पळ काढत असताना या चोरट्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या जवळ असलेली बंदूक रस्त्यावरच पडून गेली मात्र ती तशीच सोडून चोरटे पळून गेलेत

घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीचे काम सुरू आहेत. नेमका किती माल आणि रोकड दरोडेखोरांनी लुटून नेली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.