यावल :- शहरातील सुदर्शन चित्र मंदिर परिसरात असलेल्या पंढरी उर्फ पंकज टेलरच्या दुकानात आज दि.19 रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे आग लागून 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.
नगरसेविका रुखमाबाई भालेराव यांचे चिरंजीव गणेश महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
शहरात बाबूजीपुरा ते सुदर्शन चित्रमंदिर रोडवर असलेल्या पंकज उर्फ पंढरी टेलरच्या दुकानात आज दि.19 रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक वायर व बोर्ड जळून आग लागून दुकानातील शिलाई काम पूर्ण झालेले अनेक ड्रेस, पॅन्ट पीस, शर्टपीस जळून एकूण 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले . दुकानात कोणीही नव्हते. दुकाना मागील घरात रहिवास आहे. शॉक सर्कीटमुळे वीज पुरवठा खंडित झाला, शॉर्टसर्किटमुळे घरातील वीज पुरवठा खंडित होऊन घरातील पंखे ,लाईट बंद झाल्याने पंकज टेलर व त्यांच्या मुलाची झोप मोड झाली, जाग आली तेव्हा त्यांनी त्यांना काहीतरी जळत असल्याचा वास आला, त्यांनी घरा बाहेर येऊन बघीतले असता दुकानातून धूर व कपडे जळत असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांनी व त्यांच्या मुलांनी दुकानात पाणी फेकून आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत दुकानातील शिलाई झालेले कपडे व शिलाई साठी आलेले शर्ट व पॅन्ट पीस जळून एकूण 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांकडे सकाळी तक्रार देण्यास गेले असता प्रथम वीज वितरण कंपनीकडे तक्रार द्या मग यावल पोलिस स्टेशनला तक्रार घेऊन या असा सल्ला यावेळी पोलिसांनी फिर्यादीला दिला पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण टेलर व्यवसायिकांची लक्षवेधून आहे.