यावल | प्रतिनिधी
निंबोल बँक हल्याच्या प्रकरणी तपास करण्यासाठी जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाला यावल येथून उतारकरूंकडे अवैद्य रित्या चंदनाचं लाकूड आढळून आले आहे. तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर उतारकरू पारधी समाजातील असुन त्यांच्या कडे शिकारीकरिता तयार करण्यात आलेले बॉम्ब असल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती तेव्हा कारवाई दरम्यान बॉम्बची पिशवी घेवुन एक जण पसार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे तेव्हा यावलला केल्या गेलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील निंबोल येथे बँकेत दरोडाचे उद्देशाने एका सहाय्यक व्यवस्थापकाची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना जिल्हा गुन्हे शाखेने गोपनिय रित्या माहिती मिळवली असता यावल शहरात फैजपुर रस्त्यावर उतारकरूं कडे हत्यार व हात बाॅम्ब असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा बुधवारी रात्री त्या उतरकरू कडे जिल्हा गुन्हे शाखेचे पथकासह यावलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांचे पथक दाखल झाले व त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली तर या कारवाई दरम्यान एक जण एक पिशवी घेऊन पोलिसांच्या नजरेआड होउन पसार झाला. तेव्हा त्याच्याकडे सतरा ते अठरा शिकारीकरिता तयार करण्यात आलेल्या हात बाँब असल्याचं देखील समोर येत आहे. त्याचा शोध पोलिस घेत असुन या कारवाइत पकडण्यात आलेल्या दुबराज छोटेलाल पारधी वय ५० व रतदिपलाल दुबराज पारधी वय २८ दोघं रा. ग्राम हरदुबा ता. रेटी जि. कटनी (मध्यप्रदेश) त्यांच्या जवळ अकरा किलो ५५८ ग्रॅम चंदनाचे लाकूड अवैद्य रित्या आढळून आले. तेव्हा फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्याशी चर्चा केल्यावर सदर वन विभागाकडे हा गुन्हा देण्यात आला व वनक्षेत्रपाल विशाल कुटे व व्ही. एम. पाटील यांना बोलावून सदर आरोपी व मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला तर गुरूवारी दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना एका दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुढील तपास वन विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहे.
रानडुकराच्या शिकारी करून त्यांचे अवयवांची तस्करी
सदर पारधी समाजाचे काही जण वनातील प्राण्यांची ची हत्या करण्याकरिता हातबाँब घेऊन या भागात वावरत असल्याचे समोर आले आहे. सदर बॉम्ब हे पीठाच्या कणीक मध्ये टाकले जातात रानडुक्कर ते खातं व ते ब्लास्ट झाल्यानंतर तो मरतो तेव्हा त्याच्या शरीरातील कातळी, चरबी सह इतर अवयवांची तस्करी सदर लोक मध्यप्रदेशात करत असल्याचे देखील बोलले जात आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.