Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही!
    • राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार!
    • आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
    • पहाटे नदीतून घुमले मोठे आवाज अन् महापूर धडकला
    • पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात
    • परिसरात वीज गेली म्हणजे संपर्क तुटला!
    • दिल्लीतील आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश
    • लोहारा येथील दिव्यांग इसमाचा सुरत येथे मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»‘यश’ हाच जीवनातील खरा अलंकार- प्राचार्य डॉ. अनिल खर्चे
    महाराष्ट्र

    ‘यश’ हाच जीवनातील खरा अलंकार- प्राचार्य डॉ. अनिल खर्चे

    By June 12, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापुर (प्रतिनिधी) : स्थानिक पद्मश्री डॉ वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतील प्रशांत दिलीप राणे या विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर आघाडीवर असणाऱ्या प्रायमस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीत असोसिएट कन्सल्टंट म्हणून साडेसहा लाखाच्या आकर्षक पॅकेज वर नुकतीच निवड झाली आहे. प्रशांतने प्राप्त केलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाविद्यालयाचे डीन प्रा. युगेश खर्चे व मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. संतोष शेकोकार यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशांत चा महाविद्यालयात सत्कार केला. व त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    लॉकडाउन कालावधीत देखील कोलते महाविद्यालयाने सामाजिक दायित्व म्हणून महाविद्यालयात विविध कंपन्यांचे ओपन कॅम्पस ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात एकमेव कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाने  विद्यार्थ्यांसाठी भरपूर प्रमाणात कॅम्पस च्या संधी उपलब्ध करून दिल्या. मागील सत्रात ९० टक्के च्या वर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट केली. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या नामांकित कंपन्याचे कॅम्पस यापुढे महाविद्यालयात आयोजित होत राहतील अशी ग्वाही याप्रसंगी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन प्रा. युगेश खर्चे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाशी बोलतांना दिली.

    कोलते महाविद्यालय प्लेसमेंट बाबतीत नेहमीच अग्रेसर आहे. विद्यार्थी वर्गाने कठोर परिश्रम करणे ही वर्तमान स्पर्धेच्या युगातील आवश्यकता आहे. अभ्यासात सातत्य ठेवून विविध परीक्षा व स्पर्धेची तयारी केली तर निश्चितच यश प्राप्त होते. इतिहासाचा विचार करता असे जाणवते की अनेकांनी प्रचंड मेहनत करून आपल्या जीवनात यशाचे शिखर गाठले आहे. यश प्राप्तीमुळे व्यक्तीला सामाजिक जीवनात सन्मान प्राप्त होत असतो. म्हणून ‘यश हाच जीवनातील खरा अलंकार आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी व्यक्त केले आणि कॅम्पस मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

    कोलते महाविद्यालयात मिळालेल्या ज्ञानामुळेच मला यश मिळाले व माझी नामांकित कंपनीत निवड झाली.  माझ्या आईवडीलांची स्वप्ने साकार झाली.  कोलते महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाचे केंद्रबिंदू आहे. अभियांत्रिकी शिक्षणाकरीता विद्यार्थ्यांनी कोलते महाविद्यालयाला प्राधान्य द्यावे, असे भावपूर्ण वक्तव्य यावेळी प्रशांत ने केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार!

    October 11, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif