पिंपळगाव (हरेश्वर) | प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद अध्ययन मंच राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था प्रती पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर अभ्याषिकेच्या माध्यमातून सैन्य दलात भरती झालेल्या तरुणाचा शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार मुकेशजी हिवाळे मार्ग दर्शन करतांना म्हणाले.पिंपळगाव पंचक्रोशीतील पिंपळगाव, भोजे, चिंचपुरा, शिंदाड, सावखेडा येथील 18 तरुणांना स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.या तरुणांचे प्रेरणा स्थान मेजर विनय पाटील असून.कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मुकेशजी हिवाळे नायब तहसीलदार तसेच संरपच गौरख पाटील,परेश पाटील सर,आणि जिग्नेश सुकडीया,सतीश पाटील,विकास लोहार,योगेश हटकर,कडूबा पाटील,नाना बडगुजर,हजर होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर पाटील,भैया काळे यांनी प्रयत्न केले.स्वामी विवेकानंद अध्ययन मंच अभ्यासिकेच्या माध्यमातून या तरुणांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्या वेळी पुण्यनगरीचे वार्ताहार राजु शिवाजी ठाकुर हे उपस्थित होते.