Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी : कृषिमंत्री दादाजी भुसे
    ताज्या बातम्या

    यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी : कृषिमंत्री दादाजी भुसे

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 15, 2020Updated:February 15, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे म्हणून कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरीदेखील अनुभवाच्या आधारे पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादन घेतात. इतर शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी अशा यशस्वी पीक पद्धतींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
    पारोळा तालुक्यातील दळवेल येथे शिवार पाहणीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अमळनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर आदी उपस्थित होते.
    श्री. भुसे यांनी भगवान पाटील आणि परमेश्वर पाटील यांच्या शेताची पाहणी केली. शेतातील मक्याच्या उत्पादनाचा अभ्यास करून इतरही शेतकऱ्यांना असे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात ही रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेले आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या बैठकाही घेण्यात आल्या असून लवकरच मंत्री मंडळाला अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतरस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात येईल आणि कृषी विभागातील पदे लवकरच भरण्यात येतील, असेही श्री. भुसे म्हणाले.
    कृषिमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत रोटोव्हेटर आणि अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. हरी गवळी आणि मनीषा गिरासे याना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत बंदिस्त शेळी पालनासाठी 11 शेळींचे युनिट देण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
    https://twitter.com/InfoJalgaon/status/1228557916447236097?s=20

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif