Sunday, November 27, 2022

यवतमाळातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार?

- Advertisement -

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविणार असा अंदाज व्यक्त केला जात

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर, शुक्रवारी त्यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. दरम्यान, उद्धव ठाकरे हे अद्याप विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद व्हावं लागेल. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता दुसऱ्या आमदाराला राजीनामा द्यायला लावून पुन्हा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे हे तसं सोईचं नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जातील असं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान, यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून तीन वर्षांपूर्वी उस्मानाबादचे तानाजी सावंत हे निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढवून विधान परिषदेचे सदस्य होणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या