…म्हणून राज्यात कोरोनाचं प्रमाण झपाट्यानं वाढलं ; केंद्रीय पथकाने दिला ‘हा’ अहवाल

0

मुंबई | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 9 हजार रुग्ण आढळत असून ही चिंतेची बाब आहे. दरम्यान अचानक कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं का वाढू लागलं? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली.

 

कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने सांगितलं.

 

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.