मलकापूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तव्य पथातील स्वच्छता अभियान, दिव्यांग प्रज्ञाचक्षू कल्याण, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वल गॅस योजना, सुरक्षा विमा योजना, मुद्रा योजना, अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जन धन योजना अशा सगळ्याच ध्येयांना दृष्य आकार देण्यासाठी खासदार म्हणून मी माझे योगदान दिलेले आहे. म्हणूनच मी चौकीदार आहे असे प्रतिपादन रक्षाताई खडसे यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप महायुतीच्या उमेदवार खा.रक्षाताई खडसे यांचा प्रचार व भव्य सभा मलकापूर शहरात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
सभेला यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपस्थित विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष चैनसुखजी संचेती, मलकापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुलभाऊ संचेती, रावेर लोकसभा संयोजन समिती सहसंयोजक माधवराव गावंडे, रावेर लोकसभा संयोजन दौरा सहप्रमुख मोहनजी शर्मा, तालुकाध्यक्ष दादाराव तायडे, शिवसेना शहराध्यक्ष विजयभाऊ नवले, शहराध्यक्ष रामभाऊ झांबरे, पंस सभापती संगीता दादाराव तायडे, जिप सदस्य केदारभाऊ ऐकडे, पंस सदस्य संजय काजळे, मलकापूर कृ उ बा समिती सभापती साहेबराव पाटील,माजी जिप सदस्य विलासकाका पाटील, बोदवड कृ उ बा समिती सभापती निवृत्ती पाटील, रामभाऊ शर्मा, राजूभाऊ खरारे, मुक्ताईनगर नगरसेवक ललित महाजन, महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.