… म्हणून आम्ही अजित पवारांसोबत गेलो : आ. अनिल पाटील

0

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकारणाने शनिवारी २३ रोही पहाटे अचानक एक वेगळंच वळण घेतलं आहे. राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी वारंवार चर्चा होऊनही शिवसेनेसोबत काही जमत नसल्याचा संदेश आमच्यापर्यंत आल्याने आम्ही अजित पवारांसोबत गेलो होतो, असे स्पष्टीकरण अमळनेरचे आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांनी माध्यमांशी बोलतांना दिले आहे.  शपथविधीवेळी अजित पवारांसोबत गेलेले दौलत दरोडा, अनिल पाटील आणि नरहरी झिरवळ हे तिघेही आमदार पुन्हा परतले आहेत.

शपथविधी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवारांसोबत गेले होते. त्यातले बरेचसे आमदारांनी आम्ही शरद पवारसाहेबांसोबत असल्याचे सांगत पक्षात वापसी केली आहे. आम्ही कुठेही बंडखोरी करुन गेलो नव्हतो ही केवळ अफवा होती. या काळात आमचा सुप्रिया सुळे, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी संपर्कात होतो.” राज्यात एनसीपीचे सरकार बनणार आहे, असा विश्वासही दरोडा यांनी व्यक्त केला आहे. हे तीनही आमदार परतल्याने आता अजित पवारांसोबत केवळ आमदार आण्णा बनसोडे असल्याचे कळते.

“शिवसेनेसोबत काही जमत नसल्याचा संदेश आम्हाला आला. त्यामुळे बाकीचे आमदार येतील आपल्याला पुढे जायचं आहे, असे सांगण्यात आले त्यामुळे आम्ही अजित पवारांसोबत गेलो. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार पळून गेले असं काहीही नव्हतं. दरम्यान, आम्ही शरद पवारांना फोन केला त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला शिवसे

Leave A Reply

Your email address will not be published.