नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020 -2021 चा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अडीच तासांपेक्षा अधिक काळ अर्थसंकल्प वाचून दाखवला. मात्र, अर्थसंकल्पाचं वाचन करत असताना मध्येच सीतारामन यांची तब्येत बिघडली. हे लक्षात आल्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांना बसण्यास सांगण्यात आले. अर्थमंत्र्यांचे भाषण सुरू असताना त्यांचा रक्तदाब कमी झाला, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा दुसरा अर्थसंकल्प आहे. याबरोबरच, त्यांचे आजचे भाषण हे त्यांनी या पूर्वी केलेल्या भाषणाहून मोठे होते. म्हणजेच त्यांनी भाषणाचा स्वत:चाच विक्रम मोडला आहे. मात्र, तब्येत बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले भाषण मध्यंतरावर बंद केले.