मौजमजेसाठी बुलेट गाड्या चोरणार्‍या दोन्ही भावांना अटक ; एक फरार

0

जळगाव । एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बुलेट व केटीएम यासारख्या महागड्या दोन स्पोर्टी बाईक चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले होते. दरम्यान या गुन्ह्यातील दोन्ही भावासह एका अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले.

याबाबत अधिक असे की, सिंधी कॉलनीतून दि.15 मार्च रोजी एक बुलेट गाडी चोरली होती. त्याच रात्री आणखी एक बुलेट एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरली होती. किसन गजराम यादव (21) व शुभम गजराम यादव (20 रा. दोघे रामेश्वर कॉलनी) आणि त्यांचा मित्र तुषार जोशी (रा. प्रजापत नगर) हे तीघ बुलेट, केटीएम यासारख्या महागड्या स्पोर्टी बाईक चोरून मिळालेल्या पैश्यातून मौजमजा करण्यासाठी या गाड्या चोरी करीत होते. या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही चोरीच्या घटनांचा पोलिसांकडून तपास असतांनाच रामेश्वर कॉलनीतील दोघं भाऊ एका स्पोर्ट बाईकचे पार्ट विक्री करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने डमी ग्राहक पाठवून किसन यादव व शुभम यादव यांच्याकडून दोन बुलेट गाड्या व शनिपेठच्या हद्दीतून चोरलेल्या स्पोर्ट बाईकचे पार्ट मिळून आले आहे. तर या दोन्ही भावांच्या टोळीतील एक संशयित अद्याप फरार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.