पाचोरा – तालुक्यातील मोहाडी येथे मुलभूत सुविधांचा अभाव आहे.गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्यामुळे साथीचे आजार उद्धभवण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे वारंवार तक्रार करुन देखील दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
पाचोर तालुक्यापासून दहा किमीच्या अंतरावर मोहाडी गाव आहे.मात्र यागावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मुलभूत सुविधांचा अभाव आहे. सार्वजनिक शौचायलय, गटारी, रस्ते नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे शासन स्तरावरुन विविध योजना राबविण्यात येत असल्यातरी प्रशासकीय स्तरावरुन योजनांची कुठलिही अंमलबजावणी केली जात नाही. सध्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरीही प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषद,पंचायत समितीकडे केली आहे. मोहाडी गावात मुलभूत सुविधांचा अभाव असून प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.