मोरफळ येथील महीलेचा ह्रदयविदारकाने मृत्यु

0

पारोळा – मोरफळ ता,पारोळा येथील महीलेचा हदयविकाराने मृत्यु झाल्याची घटना ता,20 रोजी घडली.

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार कविता शंकर पवार (वय 33) यांचे सकाळी  अचानक छातीत दुखु लागले.यावेळी तीचा बी.पी.कमी झालेला असल्याने त्यामुळे हद्यविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यु झाला.यावेळी तीस पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता डाँक्टरांनी तपासुन मयत घोषित केले.

रमेश रामलाल पवार यांच्या खबरीवरुन पारोळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.तपास हवलदार रविंद्र रावते करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.