मोबाईल मध्ये अश्लील फोटो काढुन विवाहितेवर बलात्कार

0
पाचोरा ️- प्रतिनिधी – नुकताच विवाह झालेल्या १९ वर्षीय  विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी पाचोरा  दोन  तरुणांवर अपहरण व बलात्काराचा गुन्हा  दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
    पोलिस सुत्रांकडून प्राप्त  माहिती अशी की, पाचोरा येथील माहेर व नगरदेवळा सासर असलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेस सोनु उर्फ शरीफ मोहम्मद बागवान रा. अक्सानगर याने विवाहितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तर शाहरूख खान फारूखखान रा. बिस्मिल्ला नगर (दोन्ही रा.पाचोरा) आरोपींनी नवविवाहितेस दि. २६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास आरोपी सोनु उर्फ शरीफ मोहम्मद बागवान रा. अक्सानगर पाचोरा याने फिर्यादीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून  सासरचे  बळजबरीने येऊन पळवून नेले. रस्त्याने येत असतांना निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या जवळील एका शेतात आरोपी शाहरूख खान फारूख खान रा. बिस्मिल्ला नगर पाचोरा याने फिर्यादीस चापटा बुक्यांनी मारहाण केली. तर आरोपी शरीफ मोहम्मद बागवान  यांने विवाहितेवर बळजबरी करून अत्याचार ( बलात्कार)  केल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात भाग ५ गुरनं१८२/२० भादवि कलम ३७६,३६३,३२३,५०४,५०६ ,३४ प्रमाणे फिर्यादी विवाहितेने दिलेल्या तक्रारी वरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.