मोदी सरकार आलं तरी १३-१५ दिवस टिकेल – शरद पवार

0

मुंबई :- नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६ च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवस टिकेल, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी भाकित वर्तवलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे, या महासंग्रामाचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रात मोदी सरकारविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यात आघाडीवर असलेल्या पवारांनी केलेल्या भाकिताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपविरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या २१ मेपर्यंत त्याचं प्रत्यक्ष स्वरूप तुमच्यापुढे येईल, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.