मोदींच्या सभेत कंगवा, चुना डबी, पेन नेण्यास मनाई

0

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक येथील पिंपळगावमध्ये सभा होत असून या सभेत चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली. सभेला येणाऱ्या नागरिक आणि कार्यकर्त्यांची कसून तपासणी केली जात आहे. कंगवा, चुना डबी, पेन, अशा वस्तू प्रवेशद्वारावरच जप्त केल्या जात आहेत. पिंपळगाव बसवंत कांदा उत्पादनामध्ये अव्वल असल्याने संतप्त शेतकऱ्यांकडून कांदाफेकीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशवीतून आणलेले खाद्यपदार्थ यांनाही बंदी घालण्यात आली आहे. एकूणच पोलिसांनी मोदींच्या सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला तपासून प्रवेश दिला आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेने कांदा उत्पादकांच्या रोषाचा धसका घेत नागरिकांची चांगलीच झडती घेतली आहे. दरम्यान, मोदींच्या सभेच्या ठिकाणी काही डाव्या विचारांच्या संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.