नवी दिल्ली :- सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास नरेंद्र मोदी सज्ज झाले असून केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची यादी निश्चित झाली आहे. शपथविधीपूर्वी आज संध्याकाळी ४.३० वाजता मोदींनी सर्व भावी मंत्र्यांना भेटीसाठी बोलावले आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयातून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना फोन केले जात आहेत. सूत्रांच्या हवाल्याने या संभाव्य मंत्र्यांची नावे प्रसारमाध्यामांमध्ये प्रसिद्ध झाली असून नव्या मंत्रिमंडळात अपेक्षित चेहरे दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सुमारे दीड तास चर्चा करून मंत्र्यांची नावे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यानुसार शपथविधीसाठी रविशंकर प्रसाद, सदानंद गौड़ा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, जी किशन रेड्डी आणि मुख्तार अब्बास नकवी यांना फोन आले आहेत. याशिवाय अर्जुन मेघवाल, प्रल्हाद पटेल, बाबुल सुप्रिमो, निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, कैलाश चौधरी, किरण रिजिजू, नितिन गडकरी, किशनपाल गुर्जर, हरसिमरत कौर, थावरचंद गहलोत, राव इंद्रजीत सिंह आणि रामदास आठवले यांनाही पंतप्रधान कार्यकल्यातून फोन आले आहेत. यामुळे संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचा चेहरा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु, गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही बिग फोर मंत्रालये कुणाकडे जाणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.