नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे. भारताच्या पुरुष संघाने नुकतंच ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं आहे. त्यातच मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
देश को गर्वित कर देने वाले पलों के बीच अनेक देशवासियों का ये आग्रह भी सामने आया है कि खेल रत्न पुरस्कार का नाम मेजर ध्यानचंद जी को समर्पित किया जाए। लोगों की भावनाओं को देखते हुए, इसका नाम अब मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार किया जा रहा है।
जय हिंद!
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
लोकांच्या भावनांचा आदर राखून हा निर्णय़ घेण्यात आला असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. आणखी एक ट्विट करताना त्यांनी म्हटलं की, ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने आपली छाती अभिमानाने भरून आली आहे. विशेषता हॉकी संघाच्या कामगिरीने विजयासाठी केलेला संघर्ष आणि कष्ट सध्याच्या तसंच भविष्यातील तरुणांसाठी मोठी प्रेरणा असणार आहेत.