मोठी बातमी.. हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेल्या ग्रुप कॅप्टनचा मृत्यू

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्राणज्योत अखेर मालवली. दुर्घटनेनंतर त्यांना बंगळुरूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात सीडीएस जनरल रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता. यातील वरुण सिंह हे एकमेवर अधिकारी बचावले होते. अखेर त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचे सीडीएस बिपीन रावत  यांचे तामिळनाडुतील कुन्नुर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅश अपघातात रावत यांच्यासह 14 जणांचा निधन झाले आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. अपघातावेळी 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते.

सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat), ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश (Helicopter Crash inquiry ) दिले आहेत. या हेलिकॉप्टरमधून रावत यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.