Wednesday, May 25, 2022

मोठी बातमी.. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर आज सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता अज्ञात इसमांनी दगडफेक केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दगडफेक झाली त्यावेळी त्यांच्या कारमध्ये त्या स्वतः होत्या, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत पोलिस अधिक माहिती घेत असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.

रोहिणी खडसे- खेवलकर या चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी येथील त्यांच्या घरी परतत होत्या. त्याचवेळी मुक्ताईनगर सूतगिरणी जवळ अज्ञात इसमांनी समोर येत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांची फॉर्च्युनर कार (एम एच १९ सीसी १९१९) याचा पुढील बाजूने काच फुटला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे रोहिणी खडसे या प्रचंड घाबरलेल्या असून कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या