Wednesday, May 25, 2022

मोठी बातमी.. राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा खाली येणारा आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह, ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढता दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते,” असे संकेतही पवार यांनी दिले.

“अधिवेशनाच्या कालावधीत केवळ पाच दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच राज्य सरकारनं कोरोनाची नवी नियमावली जाहीर केलीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

‘दुसऱ्या लाटेची किंमत मोजलीये’

“प्रत्येकाला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे व्हावं असं वाटतंय. पण नव्यानं आलेला कोरोनाचा व्हेरिअंट वेगानं पसरत आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सरकारही प्रयत्न करतंय. आताच नियम कडक का असा आग्रह करु नये, सर्वांनी सहकार्य करावं,” असंही पवार म्हणाले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या