मोठी बातमी.. जिल्हा बँक अध्यक्षपदी गुलाबराव देवकर; उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

पहा थेट लाईव्ह…..👇

जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ही निवडणूक खूप गाजली. या निवडणुकीत अनेक नवनवीन राजकीय घडामोडी झाल्या.  जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात आयोजीत करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्ता वाटपाच्या सूत्राची माहिती दिली.

थेट लाईव्ह….👇

यावेळी खडसे म्हणाले की, पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद मिळणार असून नंतरची दोन वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार आहे. तर पहिले दोन वर्ष कॉंग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार आहे. या अनुषंगाने उद्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.

दरम्यान,  आज सकाळी जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या संचालकांनी बैठक झाली. यात एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि  शिवसेनेतर्फे उपाध्यक्षपदासाठी शामकांत सोनवणे  यांच्या नावाचा शिक्कामोर्तब केला असल्याची माहिती दिली.  दोघांची निवड निश्चित झाली असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here