मोठी दुर्घटना.. गॅस गळती झाल्याने ६ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक गंभीर

0

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सुरतमध्ये केमिकलने भरलेल्या टँकरला  गळती लागल्यामुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २६ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरतच्या सचिन जीआयडीसी एक्स्टेंशन परिसरात केमिकल गळती  झाल्यामुळे हा अपघात झाला.

सचिन जीआयडीसी हा औद्योगिक परिसर आहे. टँकरमधून विषारी रसायनाची गळती झाली. रसायन हवेत पसरल्यानंतर लोक बेशुद्ध झाले. सर्व मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गळती झालेल्या टँकरमध्ये जेरी केमिकल  असल्याचे बोलले जात आहे.

केमिकलने भरलेला टँकर सुरतच्या जीआयडीसी भागातील एका कारखान्यात पोहोचला. परंतु, रसायन काढताना गळती झाल्याने हे रसायन हवेच्या संपर्कात आले. यानंतर ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींवर सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलीस अजूनही या भागात मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

टँकर चालक प्रिंटिंग मिलजवळील नाल्यात रसायन टाकत असताना अपघाती गॅस गळती झाली. काय घडत आहे हे आजूबाजूच्या लोकांना समजेपर्यंत, विषारी वायू आधीच उघड्या आउटलेटमधून पसरला आणि त्यानंतरच्या काही क्षणांत तब्बल सहा लोकांचा बळी गेला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.