मोठा दिलासा : जळगाव जिल्ह्यात आज केवळ १६९ नवे रुग्ण, तर ०४ जणांचा मृत्यू

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. महिनाभरापासून सुरु असलेली नव्या रुग्णसंख्येतील घट कायम आहे. शुक्रवारी या लाटेतील सर्वांत कमी म्हणजे १६९ रुग्णांची नोंद झाली, तर २७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दिवसभरात ०४ रुग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १ मेपासून सातत्याने नव्या बाधितांमध्ये घट होऊन बरे होणाऱ्यांचा आकडा वाढत राहिला. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ५०० झाली. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३० हजार ५५४ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत ०४ जणांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५२० एवढा आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-२०, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-६, पाचोरा-७, भडगाव-५, धरणगाव-०, यावल-२०, एरंडोल-१, जामनेर-२३, रावेर-१२ पारोळा-१२, चाळीसगाव-४२, मुक्ताईनगर-३, बोदवड-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.