मोटारसायकल चालवितांना हेल्मेट वापरा: आवाहन

0

जळगाव,दि.14-

जिल्ह्यातील अपघाती मृत्यू कमी करणे संदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा बैठकांचे आयोजन पोलिस अधिक्षक कार्यालय येथे करण्यात येवून त्यात अपघातांचे विश्लेक्षण करतांना मोटार वाहन चालकांंनी हेल्मेट न वापरल्याने बरेचजण मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे बैठकीत सर्वानुमते जळगाव जिल्हयात महामार्गावर हेल्मेट सक्ती करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

अपघात कमी करण्यासाठी पारोळा ते मुक्ताईनगर(चिखली), जळगाव ते चाळीसगाव(कन्नडघाट)पावेतो महामार्गाची पाहणी करून महामार्गांवर रम्बलर स्ट्रिप, रिफ्लेक्टर, कॅट आय, रेडीयम, सुचना फलक, मार्गदर्शक फलक वगैरे लावणेबाबत संबंधीत विभागांना कळविण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोटार सायकल वापरतांना अपघात होवू नये म्हणून हेल्मेट वापरून सहकार्य करावे व आपली व आपल्या कुटूंबांची वाताहत होवू नये म्हणून याची काळजी घ्यावी. जे नागरिक मोटार सायकल चालवितांना हेल्मेट वापरतांना न आढळल्यास अशांवर 21 जून पासून जिल्हा पोलिस दल, महामार्ग पोलिस पथक , उपप्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.)मार्फत कारसाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.