भडगाव :- शहरातील यशवंत नगर वरची बर्डी भागातील रहिवाशी विशाल यशवंत कोळी (वय १८) हा राहत्या घरासमोर दि २७ रोजी दुपारी ३ वाजता इलेक्ट्रॉनिक मोटार लावून पाणी भरत असतांना इलेक्ट्रॉनिक मोटार चा शॉक लागून घराच्या बाहेर फेकला गेला . त्यास औषधोपचार साठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले . या घटनेचा तपास पोलीस नाईक हिरालाल पाटील करत आहेत . तरुणाचा अचानक शॉक लागून मृत्यू झाल्याने या भागात एकच हळहळ व्यक्त होत आहे .
याबाबत भडगाव पोलिसात मयताचे वडील यशवंत कोळी यांनी दिलेल्या खबर हुन अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे .