अन्यथा मोकाट गुरांना गौव शाळेत पाठवु शेतकऱ्यांचा इशारा
पारोळा – तालुक्यातील वंजारी व म्हसवे शिवारातील शेतांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट गुरे उभ्या पिकांची नासधुस करीत आहे या बाबत अनेक वेळा मोकाट गुरांचे मालकांना सांगूनही काहि एक उपयोग होत नसल्याने या मोकाट गुराचा बदोंबस्त करावा अश्या आशियाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
पारोळा शहरातील मोकाट गुरे धारक हे दररोज आपले गुरे मोकाट सोडून देत असल्या मुळे शहरात व गांवा लगत असलेल्या वंजारी व म्हसवे शिवारातील शेतातील गहु , हरबरा , दादर , कांदा , मका , बाजरी , ज्वारी , तुर , भईमूग इत्यादी पिके हे मोकाट गुरे खाऊन फस्त करीत आहे . एक – दोन मोकाट गुरे नव्हे तर चाळीस ते पन्नास गुराचा कळपा हे शेतात घुसुन पिकाची नास – धुस व नुकसान करीत असल्याने शेतकरी हातबल झाले आहेत अनेक वेळा मोकाट गुराच्या मालकाना या बाबत वेळोवेळी सांगून ही उपयोग होत नाही .
गेल्या तीन ते चार वर्षा पासुन अल्प पावसा मुळे तसेच या वर्षी अतिपावसाने पावसाळी पिके हातातुन गेली आहेत . आता रब्बी पिके पेरलेली असतांना या मोकाट गुरांन मुळे नुकसान होत आहे सदर गुरे मालक बाळु भोई ( शेगादाणेवाले ) , देवल आधार भोई , प्रकाश बाबुलाल ठाकुर , नाना धदु भोई , हरी अर्जुन पचाल ( पावर ) , चुडामण शंकर पाटील , आरीफ मुसलमान , यांच्या घरी जाऊन शेतकरी गायींना घरी बांधून ठेवण्याचे सांगितले असता शेतकऱ्यांनाच दमदाटी करून पोलिसात जा , तुमच्या कडून जे होईल ते करा अशी धमकी हे मोकाट गुराचे मालक देत आहे . तरी या मोकाट गुराचा प्रशासनाने बंदोबस्त करुन मोकाट गुरांच्या मालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मनोहर
संदानशिव , सुदाम चौधरी , अरुण पाटील , अलीमउद्दीन जलाउ६ीन , राजु बारी , जितेंद्र बारी , अशोक बारी , पुरुषोत्तम बारी , संजय बारी , प्रभाकर बारी , विजय पाटील , नाना पाटील , नंदु पाटील , पांडुरंग बारी , शाम चौधरी , कालु पाटील , अरुण चौधरी , बापु मराठे , आदिनी केली आहे .
मोकाट गुरे शेतामधील पिकांची नासधुस करीत असल्याने गुरे मालक काहि एक लक्ष देत नसल्या मुळे आता हया भागातील शेतकरी ज्याच्या शेतात मोकाट गुरे दिसतील अश्या गुरांना धरून ती अमळनेर गोशाळेत पाठविणार आहे . आता पर्यंत पाच गुरुना पकडून गुरे गोशाळेत पाठविले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे,