अमरावती (प्रतिनिधी) : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण राज्यात एक मे पर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात दररोज पाचशे ते सहाशे कोरोणा बाधित रुग्न निघत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती जिल्ह्या सह शहरात कडक निर्बंध लागू केले आहे.
कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने ती संपूर्ण काळजी घेतली जात आहे. मात्र मॉर्निंग वाॅक व नाईट वाॅक करणाऱ्यांकडून लाॅकडाउन चा फज्जा व कोरोना संक्रमण वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे . लाॅकडाउन चे नियम सर्वांसाठी लागू असताना सकाळ संध्याकाळ कुटुंबासह फिरणार्यांसाठी नियम नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .
शहरातील वेलकम पॉइंट, रहाटगाव रोड, उड्डाणपूल, छत्री तलाव, विद्यापीठ रोड, मालटेकडी या परिसरात व जवळजवळ मुख्य सर्वच रस्त्यांनी सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. फिजिकल डिस्टन्स उडवीत , गप्पा मारणे , फिरणे, हा रोजचा नियम त्यांचा झाला असल्याचे दिसत आहे. गरीब मजूर वर्ग घरातच बसून आहेत. मात्र हे रिकामी फिरणारे शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवताना दिसत असून. प्रशासनाच्या कोणत्याही नियमांचे परिणाम त्यांच्यावर होताना दिसत नाही . प्रशासन लाॅकडाऊन प्रभावीपणे राबवित आहे. मात्र सकाळ-संध्याकाळ फिरणाऱ्यांना याचे भान नाही. कोरोणा ची परिस्थिती गंभीर आहे .आता काही दिवस घरातच बसून राहिले तर प्रशासनाला नक्की सहकार्य होईल .व करुणा चा संसर्ग रोखण्यास मदत होईल. मात्र रिकामा गप्पा मारण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरणे योग्य नसल्याचे अनेक नागरिकातून बोलल्या जात आहे.अशा रिकाम्या बाहेर फिरणार्या लोकांवर कारवाई करण्यात यावि असे सूज्ञ नागरिकातून बोलल्या जात आहे.