मैत्रेयी महिला मंडळातर्फे गितगुंजन कार्यक्रम

0

डोंबिवली. –
येथील मैत्रेयी महिला मंडळ आयोजित स्मित कलारंजन प्रस्तुत सदाबहार हिंदी मराठी चित्रगित भावगीतांचा रंगारंग गीतगुंजन कार्यक्रम शुभमंगल हॉल येथे संपन्न झाला. मनोरंजन पर असा , श्रृती सुखद अविष्काराचा रसिक वर्गाने आस्वाद घेतला
मैत्रेयी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुधा ताई नंदर्षी, सचिव ज्योती वाणी, गायक प्रभंजन मराठे यांच्या हस्ते दिपप्रज्वललाने बहारदार कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रमुख गायक कलाकार होते प्रभंजन मराठे ,गायीका विद्या शिवलिंग, कश्मीरा राईलकर, .संगीत संयोजक होते मनोज शिवलिंग आणि निवेदिका सुषमा मराठे यांनी केले.
शम्मी कपूर हिट्स गाण्यावर कार्यक्रम रंगत गेला. रसिक श्रोत्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला.
या जगण्यावर शतदा प्रेम करावे , हि गुलाबी हवा, आसमानसे आया फरिश्ता , दिल तेरा दिवाना, रातके हमसफर या सारख्या गाण्यांनी गायकांनी रसिकांना संगीताच्या हिंदोळ्यावर नाचवले.
यावेळी चिवा पतपेढीचे सचिव गणेश वाणी यांचा तर नित्यसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश खारूळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्तविक सुधा नंदर्षी यांनी तर सुत्रसंचलन अनघा पाटील यांनी व श्रृणनिरदेश मंजुषा बुरूजवाले यांनी केले

मैत्रेयी महिला मंडळ आयोजित स्मित कलारंजन प्रस्तुत सदाबहार हिंदी मराठी चित्रगित भावगीतांचा रंगारंग गीतगुंजन कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्या ज्योती वाणी, सुरेखा गडे, संध्या अकोले, विद्या अकोले, अनघा पाटील, शुभांगी अकोले, ललीता सराफ , सुधा नंदर्षी , सुगंधा वाणी , अंजली अकोले,रेखा बुरूजवाले, संगीता खरे,मंजुषा बुरूजवाले, मनिषा खरे, मेघना वाणी यांचे बहुमुल्य योगदान लाभले

Leave A Reply

Your email address will not be published.