मैत्रेयच्या ठेवीदारांसाठी आ.किशोर पाटलांची गृहराज्यमंत्री ना. केसरकरांसोबत बैठक

0

पाचोरा :- संपूर्ण देशासह राज्यभरात लक्ष लागुन असलेल्या मैत्रेय विमा कंपनीतील ठेवीदारांना पैसे परत मिळणेसाठी आमदार किशोर पाटील यांनी दि. २६ रोजी गृहराज्यमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान बैठकीत ठेवीदारांना दिलासा मिळण्याविषयी तोडगा काढणार असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.

मालमत्तेच्या विल्हेवाटे करीता स्वतंत्र सक्षम प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती
मैत्रेय फायनान्स कंपनीच्या गैरव्यवहाराबाबत गृहराज्यमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कायद्यान्वये शासनामार्फत दि. २९ नोव्हेंबर २०१७, ७ एप्रिल २०१८, १ जुन २०१८ व १० एप्रिल २०१९ अन्वये सदर गुन्ह्यातील कंपनीच्या मालकीच्या एकुण ३४६ मालमत्ता व १७ जंगम मालमत्ता अधिसुचित करण्यात आल्या आहेत. सदर मालमत्तेच्या विल्हेवाटे करीता स्वतंत्र सक्षम प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मैत्रय कंपनीची महाराष्ट्रातील व इतर राज्यातील उर्वरित मालमत्ता शोधुन ती जप्त करण्याची करण्यात येत. ज्या ठेवीदारांनी अद्याप ठेवीच्या रक्कमेची मागणी दाखल केली नसल्यास त्यांनी नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हेशाखेशी संपर्क साधुन आपल्या ठेवीच्या मागणीबाबत लिहित नमुन्यात‌ अर्ज सादर करावा. असे बैठकीद्वारे आवाहनही करण्यात आले आहे. याबैठकीमुळे मैत्रेय कंपनीच्या एजंट व ठेवीदारांना लवकरच न्याय मिळण्याचे बोलले जात आहे.

बैठकीत यांची होती उपस्थिती
ना. जयदत्त क्षीरसागर, आमदार अनिल बाबर, गृहविभागाचे उपसचिव अजटराव, तरूणकुमार खत्री, इन्सपेक्टर मंजुषा परब, तहसिलदार जितेंद्र कुवंर, अर्चना पाटील, एन. डी. मोरे (सिंधुदुर्ग), कुमारसिंग राठोड (चंद्रपुर), स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, राज्यभरातील मैत्रेय कंपनीचे महिला व पुरुष एजंट उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.