चाळीसगाव – मेहुनबारे गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या 2 ओमनी महसूल पथकाने दि 18 रोजी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास पकडून मेहुनबारे पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या आहेत.
महसूल पथकाचे गणेश लोखंडे मंडळ अधिकारी मेहुनबारे, डी एस काळे तलाठी वडगाव लांबे, तलाठी , राज डोंगरदिवे तलाठी तळेगाव हे गस्तीवर असतांना मेहुनबारे येथे काळ्या रंगाची ओमनी क्र एम एच 19 वाय 0427,
व विनानंबरची पांढऱ्या रंगाची ओमनी कार मध्ये गिरणा नदीपात्रातुन चोरटी वाळू गोण्या मध्ये भरून वाहतूक करताना मिळून आले पथकाने चालक बाला दगा मोरे (मालक भूषण संजय महाजन रा मेहुनबारे), चालक व मालक नाना विलास राठोड रा करगाव यांना ओमनीसह मेहुनबारे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन वाहन जमा करण्यात आले असून त्यांच्या वर दंडात्मक कारवाई होई पर्यंत सदर ओमनी मेहुनबारे पोलिसांच्या ताब्यात असणार आहे.
दरम्यान मेहुनबारे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असून चाळीसगाव शहरात देखील रात्रीच्या सुमारास अनेक वाळूचे ट्रॅक्टर भरून येतात व बांधकामांवर वाळू खाली होत आहे याकडेही महसूल पथकाने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.