चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील राहीपुरी शिवारात गिरणा नदीपात्रात अवैध वाळूने भरले 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह मेहुनबारे पोलिसांनी दि 2 जानेवारी 2021 रोजी पहाटे पकडले असून चालक मात्र फरार झाले आहेत. दंडात्मक कारवाई साठी तहसीलदार चाळीसगाव यांना पत्र दिले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
तालुक्यातील राहीपुरी शिवारात गिरणा नदीपात्रात वाळूची चोरटी वाहतूक ट्रॅक्टर मध्ये होत असल्याची गोपनीय माहिती मेहुनबारे पोलीस स्टेशन चे स पो नि पवन देसले यांना मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि 2 रोजी पहाटे पोलीस हवालदार मिलिंद शिंदे, पो कॉ संजय कुमावत, हिलाल पाटील, गोरख चकोर, शैलेश माळी यांनी त्याठिकाणी जाऊन स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉली रहीपुरी ता चाळीसगाव) व लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर रहीपुरी ता चाळीसगाव) हे वाळूने भरलेले मिळून आले आहेत पोलिसांना पाहताच चालक मालक असलेले दोघे जण तेथून पळून गेले असून पोलिसांनी दोनही ट्रॅक्टर मेहुनबारे पोलीस स्टेशनमध्ये जमा करून दंडात्मक कारवाई साठी पत्र चाळीसगाव तहसीलदार यांच्या कडे पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.