जळगाव-येथिल मेहरूण परिसरातील दोन तोतया पोलीस गणवेश परिधान करून हातामध्ये बंदुक आणि पोलीस फायबरची लाठी घेऊन मेहरूण परिसरात आलेल्या प्रेमी युगलांकडून पैश्याची मागणी ,येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना अडऊन मोटारसायकलचे परवाना अनेक अन्य कागदोपत्राची तपासणी विचारपूस करीत होते, हि घटना ११फेब्रुवारी मंगळवार रोजी घडली .
तसेच मिळालेलं वृत्त असे कि गोपनीय माहितीच्या द्वारे सचिन चौधरी यांनी पो नि शिरसाठ यांनी कळविल्याने अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील,एच सी राजपूत,एच सी नेटकर,पी सी मुकेश पाटील याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी याप्रकरणी रवींद्र भागवत चौधरी रा भादली ता जी जळगाव,याला पकडून ठेवले होते व अटक केली, तसेच पवन रमेश काळे रा तरसोद जळगाव,यासदेखील शहरामधील अंजिठा चौफुली या परिसरांतुन अटक केली आहे, याप्रकरणी शिरसाठ याच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ सचिन चौधरी,यांनी हि कारवाई केली या तोतया पोलिसांकडून एक छऱ्यांची बंदुक,पोलीस फायबर लाठी,पोलीस गाडीचे किचन,आर १५यामाहा कंपनीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. दोघांविरुद्ध ११फेब्रुवारी मंगळवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.