मेहरूण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

0

जळगाव :- मेहरुण तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण सूर मारताना पाय चिखलात रूतल्याने रविवारी पाण्यात बुडाला. सहकारी मित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी एका मिनिटात त्याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पांडुरंग मारोती आठरे (वय २३, रा.सुप्रीम कॉलनी) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, कुटंुबियांनी तेथून मृतदेह थेट घरी नेला होता. कायद्याने शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने एमआयडीसी पोलिसांनी हा मृतदेह रात्री ८.३० वाजता पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. दरम्यान, टिकटाॅकवर व्हीडीअाे बनवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.