मेहरुण तलावात दोघा भावंडांचा बुडून मृत्यू

0

जळगाव- मेहरूण तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. उमेर जकी अहमद (वय १२) व अबुलैस जकी अहमद (वय १६, रा. अल अजीज अपार्टमेंट, अक्सानगर, जळगाव) अशी मृत बालकांची नावे अाहेत. दरम्यान, तिसरा भाऊ अनस जकी अहमद हासुद्धा त्या ठिकाणी होता. त्याने आरडा-ओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोघांना पाण्यातून काढले.

याबाबत सविस्तर असे की, उमेर, अबुलैस व अनस हे तिघे भाऊ मेहरुण तलावावर फिरण्यासाठी गेलेले हाेेते. उमेर हा तलावाच्या काठाजवळील पाण्यात उतरला. त्याचा पाय घसरुन ताे तलावात असलेल्या खाेल खड्ड्यात गेला. ताे पाण्यात बुडू लागल्यानंतर अबुलैस व अनस हे दाेघे वाचवण्यासाठी गेले. त्याला वाचवत असताना अबुलैस हा सुध्दा पाण्यात बुडू लागला. त्यावेळी अनस याने जाेरजाेरात अारडाअाेरड करायला सुरुवात केली. तलावाच्या उजव्या बाजूला परवेज अख्तर, साबिराेद्दिन पिरजादे व बबलू पिरजादे हे नागरिक उभे हाेते. मुलांचा अावाज एेकूण ते धावत अाले. त्यांनी तलावात उडी मारुन उमेर, अबुलैस व अनस यांना बाहेर काढले. त्यानंतर तलावावर नागरिकांची गर्दी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.