मेहरुणमधील महाजन नगरातील विकसित उद्यानचे महापौर महाजन, रोटरी प्रांतपालांच्या हस्ते लोकार्पण

0

जळगाव : शहरातील मेहरुण परिसरातील महाजन नगरात विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे मंगळवारी, दि. 22 जून 2021 रोजी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष श्री.जितेंद्र ढाके, सचिव डॉ.सौ.काजल फिरके, डिस्ट्रिक्ट सचिव श्री.टॉबी भगवागर, जुमाना शाकीर, श्री.अतुल शहा, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन श्री.योगेश गांधी, डिस्ट्रिक्ट सहसचिव श्री.तुषार फिरके, डॉ.श्री.जयंत जहागीरदार, आसिफ मेमन, श्री.उदय पोद्दार, श्री.मनोज जोशी, सौ.स्वाती ढाके, श्री.आशुतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेहरुण परिसरातील महाजन नगरमधील उद्यानाचे गेल्या काही दिवसांपासून महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व रोटरी क्लब जळगावच्या माध्यमातून विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये उद्यान अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभित करण्यासह तेथे विविध प्रकारची खेळणी, बाक बसविणे, तसेच उद्यान परिसरातील साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्णत्वास आल्यानंतर मंगळवारी, दि. 22 जून 2021 रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे उद्यान महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील लहान मुलांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.