भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील खडका रोड औद्योगिक वसाहत परिसरातील मेणबत्ती कारखान्यास भल्या पहाटे आगीची घटना समोर आली आहे. आग लगण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी आगीचे लोळ दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकेचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले असून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीमुळे कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.