पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा येथील मच्छी मार्केट समोर असलेले एक मेडीकल मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्याने ५६ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ भगवान देसले (वय २५, रा. ठेकू रोड रेस्ट हाऊस समोर अमळनेर) यांचे पारोळा शहरातील बाजापेठ जुने मच्छी मार्केट समोर दिव्या मेडीकल नावाचे दुकान आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता मेडीकल दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मेडीकल स्टोअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील ५६ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे काल १९ ऑगस्ट रोजी उघडकीला आले.
याप्रकरणी एकनाथ देसले यांनी पारोळा पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पाटील करीत आहे.